दिसतो 'पांडुरंग' बोलताना..........

दिसतो 'पांडुरंग' बोलताना
पीक देवाच्या शेतात डोलताना 
दिसतो 'पांडुरंग' बोलताना ॥ध्रु.॥



गाणी गाती पिके ही डोलती वाऱ्या संगे
हितगूज ही करिती दिसे प्रभूचा स्नेह
बरसताना दिसतो 'पांडुरंग' बोलताना ॥१॥

नांगरतो कुणी ओलावितो देवशेती
कृति-भक्ति फुलविते माणिक
मोती शुक-साळुंक्या वेदगान करताना 
दिसतो 'पांडुरंग' बोलताना ॥२॥

दुर्गुणांची निंदणी स्नेहाचे खत-पाणी
'स्वकर्मणा तमभ्यर्च्य गीतेची वाणी
आत्मीयता ऐक्य-प्रेम पेरताना
दिसतो 'पांडुरंग' बोलताना ॥3॥

'योगेश्वर कृषि' सांगे भक्तीतली
शक्ति स्वार्थ - भेद गळून जाणे
असे हीच मुक्ति 'दीदींची' भद्र दृष्टि पडताना
दिसतो 'पांडुरंग' बोलताना ॥४॥

कृतिभक्तिची शक्ति साकारताना
अन् खुणा क्रांतीच्या आकारताना
या 'कृषितुनी' माणूस घडताना 
दिसतो 'पांडुरंग' बोलताना 


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट